![]() |
करोनाची सहा नवी लक्षणं :संशोधकांचा दावा |
करोना व्हायरसने जगभर थैमान घातलं असून जगभरात तीस लाख जणांना संसर्ग झाला आहे. तर दोन लाखांपेक्षा जास्त जणांचा बळी या महामारीनं घेतला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत करोना व्हायरसची फक्त तीन लक्षणे असल्याचे संशोधनातून समोर आली होती. खोकला, ताप आणि श्वासोच्छवासाच्या अडचणी ही तीन लक्षणे असल्यास करोनाची चाचणी केली जात होती. मात्र, अमेरिकेच्या आरोग्य आणि मानसिक सेवा विभागाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधद्वारे त्यांच्या वेबसाइटवर करोनाची आणखी सहा नवीन लक्षणं सांगितली आहेत.
अमेरिकेच्या आरोग्य आणि मानसिक सेवा विभागाच्या वेबसाइटनुसार थंडी, सर्दी, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि गंधाची जाणीव न होणे अशी सहा नवीन लक्षणे आढळली आहेत. या सहा लक्षणांसह आता करोनाची एकूण नऊ लक्षणे झाली आहेत. अशा परिस्थितीत, जर आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर आपल्याला कोरोना संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन ते १४ दिवसापर्यंत ही लक्षण दिसल्यात तात्काळ करोनाची चाचणी करायला हवी.
करोनाची ही नवीन सहा लक्षणे खूप सामान्य असल्याचा दावाही अमेरिकेच्या आरोग्य आणि मानसिक सेवा विभागाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधद्वारे करण्यात आला आहे. करोना व्हायरस जितक्या लवकर बदलतोय तितक्या लवकर त्याची लक्षणेही बदलत आहेत. करोना व्हायरसची लागण झाल्यास न्यूमोनिया तसेच किडनी फेल्युअरसारखे परिणामही होण्याचा धोका असतो. त्यामुळे वरील लक्षणे सतत राहिल्यास डॉक्टरकडे जाऊन नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment