![]() |
मास्क परिधान न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड |
सातारा: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा यांच्यासाठी घरामधून बाहेर पडण्यापासून परत घरी येईपर्यंत चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. परंतु शहरी व ग्रामीण भागातील बरेचसे नागरिक मास्क न वापरता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक उपाययोजना म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन करुन विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना ५०० रुपये इतका दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.
या दंडाची आकारणी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक/ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व शहरी भागातील संबंधित नगरपालिका विभाग किंवा नगरपालिका कर्मचारी यांनी करावी. तसेच याबाबत इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित भौगोलिक क्षेत्रात दंडाची वसुली केल्यास ती त्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा संसर्ग
राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद गुरुवारी झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. गुरुवारी ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
0 comments:
Post a Comment
Please add comment