CoronaVirus: तर मृत्युदर वाढीची शक्यता..

Can AI help in fighting against Corona? - Towards Data Science
तर मृत्युदर वाढीची शक्यता..


करोनाची लागण झालेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ते कलंकित असल्याच्या दृष्टीने पाहिल्यास ते हा आजार वेळेवर उघड करणार नाहीत आणि परिणामी त्यामुळे मृत्युदरात वाढ होण्याची शक्यता आहे, असे मत अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

डॉ. गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करता येतात. रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना केवळ काळजी घेण्याची गरज असते. तर, २० टक्के रुग्णांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते आणि केवळ ५ टक्के रुग्णांनाच व्हिंटिलेटरची आवश्यकता असते. १५ टक्के अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर्सऐवजी अधिकच्या ऑक्सिजन सपोर्टची गरज असते आणि सरकारने हे लक्षात घेऊनच पावले उचललेली आहेत.

लोकांनी करोनाच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेगळ्या नजरेने किंवा कलंकित नजरेने न पाहता रुग्णांना आधार देण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. गुलेरिया म्हणाले. आपण करोनाग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारे मदत करू शकतो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अधिकाधिक लोकांची तपासणी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. रुग्णांच्या तपासणीसाठी गेल्या महिन्यात वैद्यकीय सोयी-सुविधांमध्ये ३.५ टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment