![]() |
चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य |
चीनचा फैलाव संपूर्ण जगभरात होण्यापासून चीन रोखू शकत होतं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटलं. करोनासंबंधी आपल्या प्रशासनाकडून गांभीर्याने तपास सुरु असून नेमकं काय झालं याची माहिती मिळवली जात असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. “आम्ही अत्यंत गांभीर्याने तपास करत आहोत. आम्ही चीनवर खूप नाराज आहोत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“चीनला करोनाचा फैलाव करण्यासाठी जबाबदार ठरवणारी अनेक कारणं आहेत. आम्हाला वाटतं करोनाचा फैलाव जेथून झाला तिथेच त्याला रोखता येणं शक्य होतं. लगेच त्याला रोखत जगात फैलाव होण्यापासूनही थांबवता आलं असतं,” असं डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत.
चीनमधील वुहान शहरातून करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली होती. वुहान हे करोनाचं मुख्य केंद्र ठरलं होतं. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार चीनवर टीका केली जात असून चीनने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्याच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठवड्यात सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पोम्पिओ यांनीदेखील चीनवर टीका करताना म्हटलं होतं की, “अमेरिकेला पूर्ण विश्वास आहे की बिजिंग करोनाच्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलं. त्यांनी योग्य वेळेत याची माहिती दिली नाही, ज्यामुळे जगभरात त्याचा फैलाव झाला आहे”. यानंतर चीनकडून परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी अमेरिकेच्या टीकेला उत्तर देताना, “उगाच राजकारण करु नका. ही सगळी ऊर्जा लोकांचा जीव वाचवण्यासाठी सांभाळून ठेवा,” असं म्हटलं होतं.
0 comments:
Post a Comment
Please add comment