सीबीएसईच्या परीक्षा होणार; मंत्र्यांनी केलं स्पष्ट

सीबीएसईच्या परीक्षा होणार; मंत्र्यांनी केलं स्पष्ट


सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. मात्र लवकरच सीबीएसई बोर्डाच्या झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरू होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं की 'दहावी, बारावीच्या ज्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरू व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.'

त्यांनी सांगितलं, 'सीबीएसई दहावी आणि बारावीच्या उर्वरित ८३ विषयांपैकी २९ विषयांची परीक्षा होणार आहे. उर्वरित वैकल्पिक विषयांचे गुण अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दिले जातील. परिस्थिती सामान्य झाल्यावर सीबीएसईच्या त्या राहिलेल्या २९ विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा.'

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जातील, या शक्यतांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पूर्णविराम दिला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा परिस्थिती सामान्य झाल्यावर घेतल्या जाणार आहेत, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment