आजचे राशीभविष्य


मेष : कुत्सित बोलणाऱ्या लोकांपासून लांब राहा. खर्चाचे प्रमाण वाढेल. आप्तेष्टांबरोबर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल.

वृषभ : कामाच्या धावपळीतही आरोग्याची काळजी नेटाने घ्याल. भागीदारीतील व्यवसाय यशस्वी होतील. वाहने सावकाश चालवा.

मिथुन : अडचणी दुसऱ्यांना सांगितल्याने सुटतील. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रिय व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधा. उत्तरार्धात कामे खोळांबतील.



कर्क : शुभकार्य ठरतील. कलाकारांना प्रसिद्धी लाभेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडतील.

सिंह : विरोधक नामोहरम होतील. महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र राहाल. भूतकाळातील आठवणींमध्ये रमून जाल.

कन्या : कामांचा ओघ वाढता राहील. फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहा. मौल्यवान वस्तू, दागदागिने जपा.

तुळ : व्यापारविषयक धोरण ठरविण्यास उत्तम दिवस. जोडीदारासोबत क्षण व्यतीत कराल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

वृश्चिक : धनलाभ होणार. मोठ्या भावंडांचे बोलणे उर्मटपणाचे असेल. तिऱ्हाईत व्यक्तींकडून मन:स्तापदायक कृती होण्याची शक्यता.

धनु : सौंदर्य प्रसाधनांवर अवाजवी खर्च करणे टाळा. आकर्षक व्यक्तीमत्त्वांचा इतरांवर प्रभाव पडेल. कामाची पद्धत सुटसुटीत बनवा.

मकर : व्यक्तीमत्त्व सुधारण्यावर भर द्या. आर्थिक हानी होईल. अपशब्द बोलणे टाळा.

कुंभ : लहान मुले म्हणजे खळाखता आनंदी झरा, याची प्रचिती येईल. मन:शांती लाभेल. आर्थिक बाजू उत्तम राहील.

मीन : रिकाम्या वेळेत घरातील कामे पूर्ण करा. आवडते छंद जोपासा. मोठ्या उपक्रमांची नांदी करण्यासाठी उत्तम काळ.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment