विनय दुबेच्या अटकेनंतर त्याचा आणि राज ठाकरे यांचा फोटो व्हायरल

विनय दुबेच्या अटकेनंतर त्याचा आणि राज ठाकरे यांचा फोटो व्हायरल
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीयांचा जमाव झाल्याचं पाहायला मिळालं होतं. हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय या ठिकाणी जमले होते. तसंच त्यांनी आपापल्या घरी जाऊन देण्याची मागणी केली होती. या प्रकरणानंतर पोलिसांनी ८०० ते १००० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच या प्रकरणी विनय दुबेलाही अटक करण्यात आली होती. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विनय दुबे यांचे फोटो व्हायरल होते. यावर मनसेनं स्पष्टीकरण देत आपला याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “पोलिसांनी अटक केलेले विनय दुबे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांशी संवाद साधायला बोलावलं होतं, इतकंच. वांद्रे घटना, दुबे आणि मनसे असा बादरायण संबंध लावण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो चुकीचा आहे,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
पोलिसांच्या मेहनतीवर पाणी

“वांद्रे येथे जे घडलं, त्यामुळे गेल्या ३-४ आठवड्यांच्या संचारबंदीवर, डॉक्टर- पोलिसांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी पडलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आता तू तू मैं मैं होईल. पण करोनाला राजकारण समजत नाही ना? केंद्र-राज्य भांडणात मुंबईकर ‘बकरा’ बनायला नकोत,” असंही ते म्हणाले होते.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment