या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. ग्रामविकास विभागाचे हे कर्मचारी म्हणजे या विषाणूच्या विरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.
२५ लाख रुपयांचे विमा संरक्षण
याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांना ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
बांधकाम कामगारांना अर्थ सहाय्यासाठी दस्तावेजाची आवश्यकता नाही
राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये थेट बँक खात्यात (DBT पद्धतीने) वाटप करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment