पुण्यात रात्रभरात ५५ करोनाबाधित सापडले

पुण्यात रात्रभरात ५५ करोनाबाधित सापडले

गेल्या काही काही दिवसांपासून रुग्ण तपासणी आणि चाचणी सुविधामध्ये वाढ केल्याने पुण्यातील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काल रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात एकाएकी ५५ रुग्ण आढळल्याने पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १३१९वर पोहोचली असून आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.


पुणे शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे काल जिल्ह्यातील रुग्णसंख्या १२६४ वर पोहोचली होती, ही संख्या आता १३१९वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण तपासणी आणि चाचणी सुविधामध्ये वाढ केल्याने ही आकडेवारी वाढल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ७० ते १०० पर्यंत रुग्ण संख्या वाढत आहे. आज संध्याकाळपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

पुण्यातील कसबा, भवानी पेठ, येरवडा, हडपसर या क्षेत्रीय कार्यालय परिसरात हे करोनाचे रुग्ण सापडले आहेत. हा परिसर झोपडपट्ट्यांचा आहे. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढत असल्याने या ठिकाणी हे रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे हे लोक आणखी किती जणांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहेत. तसेच ज्या परिसरात हे रुग्ण सापडले तो परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तसेच झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक असल्याने झोपडपट्ट्यांमधील लोकांना पालिकेच्या शाळेत हलविण्याच्या जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, करोना रुग्णांची संख्या वाढीचा दर ७ ऐवजी ५ दिवसांवर आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. हा दर ८ ते १० दिवसांवर नेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दरम्यान, पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १ हजार ३१९वर गेली आहे. तर २०६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून करोनामुळे दगावलेल्यांची संख्या ७७वर गेली आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment