आजचे राशीभविष्य


मेष:-मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.
वृषभ:-फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडी वर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.
मिथुन:-चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
कर्क:-भावनेला आवर घाला. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
सिंह:-चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगभुत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.
कन्या:-भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोजा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.
तूळ:-घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.
वृश्चिक:-तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.
धनू:-हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.

मकर:-नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.
कुंभ:-कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.
मीन:-घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment