![]() |
धोका वाढतोय ; औरंगाबादमध्ये आणखी ११ नवे करोनाबाधित |
औरंगाबादमध्ये काल दिवसभरात २३ रुग्ण आढळल्यानंतर आज सकाळी पुन्हा ११ नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील करोना रुग्णांची संख्या १२०वर गेली आहे.
आज सापडलेल्या ११ रुग्णांमध्ये नूर कॉलनीतील ९, गारखेडा, भीमनगर आणि भावसिंगपुरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा १२० झाला आहे. या सर्वांना संपर्कामुळे करोना झाल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, या सर्वांच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात येत आहे. भीमनगर आणि भावसिंगपुरा या परिसरात रुग्ण वाढीची संख्या अधिक असल्याने हे परिसर आधीच सील केले आहेत.
दरम्यान, सोमवारी २७ एप्रिल रोजी दुपारपर्यंत येथील बाधितांचा आकडा ५३ होता. मात्र सोमवारी सायंकाळी एकाचवेळी २९ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितांचा आकडा ८२ झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १३ बाधित नव्याने आढळून आले. एकूण बाधितांचा आकडा ९५ झाला. त्यानंतर दुपारी साडेतीनला झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १० बाधित असल्याचे स्पष्ट झाले आणि बाधितांचा आकडा १०५ झाला आहे. त्यामुळे केवळ २४ तासांत शहरातील बाधित ५३ वरून १०५ वर पोहोचले आहेत. हे सर्व बाधित किलेअर्क, पैठण गेट, भीमनगर-भावसिंगपुरा, दौलताबाद, संजयनगर, मुकुंदवाडी, बडा तकिया मशीद, सिल्लेखाना, भावसिंगपुरा, नूर कॉलनी, आसेफिया कॉलनी, काला दरवाजा आदी भागांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment