येस बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

येस बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित -  अर्थमंत्री निर्मला सीतारमण

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी येस बँकेतून 50 हजारापेक्षा जास्त रक्कम काढण्यावर निर्बंध लावले. आज देशभरातल्या येस बँकेच्या शाखांबाहेर खातेदारांच्या रांगा लागल्यात. यानंतर आता सरकाराने पुढे येत खातेधारकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं आश्वासन दिलंय. लवकरच या प्रकरणावर तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने दिलं असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघेही या प्रकरणात लक्ष घालून आहेत. मी स्वतःही या परिस्थितीचा अभ्यास करणार असून काही निर्यण नागरिकांसाठी घेणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर इडीने छापे मारल्याची माहिती मिळत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी येस बँक खातेदारांना आश्वासीत केलं. तुमचे पैसे सुरक्षित असून रिझर्व्ह बँक या संदर्भातील प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सीतारमण यांनी दिली. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय बँक आणि अर्थव्यवस्था यांच्या हितासाठी घेतला असल्याचेही त्या म्हणाल्या. "मी रिझर्व्ह बँकेच्या सतत संपर्कात आहे, केंद्रीय बँकेचे या प्रकरणावर पूर्ण नियंत्रण असून लवकरच हा प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. येस बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराचे पैसे सुरक्षित असून या प्रकरणावर आमचं नियंत्रण असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी मला आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.



संबंधित बातम्या पाहा 






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment