‘मुलींचा आदर’ संकल्पना राबवण्याचे निर्देश राज्यातील शाळांना देण्यात आलेत

Image result for womens day
‘मुलींचा आदर’ संकल्पना राबवण्याचे निर्देश राज्यातील शाळांना  देण्यात  आलेत  ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, मुलींप्रती आदर व्यक्त करणे, हक्काची जाणीव निर्माण करणे व अन्य हेतू ठेवून विविध कार्यक्रमांचे आयोजन शालेय पातळीवर करण्याची सूचना आहे. ८ मार्चला रविवार असल्याने ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवडय़ात हे उपक्रम राबवायचे आहेत.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मुलींचा आदर’ ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून राज्यभरातील शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण खात्याने शुक्रवारी दिले.
इयत्ता चौथी ते आठवीचे वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये मुलां-मुलींसाठी चांगल्या-वाईट स्पर्शाबाबत जागृती करणे. शारीरिक, मानसिक  त्रास किंवा लैंगिक शोषण यासारखे प्रसंग घडल्यास त्याची माहिती शिक्षक, पालक किंवा मित्रांना देण्याबाबत अवगत करण्याचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जीवन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची सूचना आहे. या माध्यमातून मुलगा-मुलगी समानता, कौटुंबिक नातेसंबंध, हार्मोन्समुळे होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीचे व्यवस्थापन याबाबत जागृती करायची आहे. आठवी ते दहावी इयत्तेतील मुला-मुलींसाठी ‘मुलींचा आदर’ या विषयावर चर्चासत्र होतील. मुलगा-मुलगी समान असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण होण्यासाठी मुली जी कामे करतात ती कामे मुलांनीही करावी, असे समानतेचे विचार रुजवण्याच्या हेतूने पालकसभा, माता-पालक संघाच्या बैठकी घेण्याचे निर्देश आहेत. मुलींबद्दल विनोद, चुकीचे विचार, वाईट मते, समाज माध्यमांवर व्यक्त न करण्याबाबत मार्गदर्शन करणे, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये उद्बोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सूचना आहे. मुलींकडून नकार आल्यास त्याचा स्वीकार करणे, स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवणे ही भावना रुजवण्यासाठी संयुक्त चर्चासत्र होतील. मुलींना कठीण प्रसंगात स्वत:चे संरक्षण करता यावे म्हणून कराटे प्रशिक्षणाची व्यवस्था क्रीडा खात्यामार्फ त करण्याचे सुचवण्यात आले आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment