आजचे राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२०


 • मेष:-घरातील कुरबुरी समजून घ्या. जि‍भेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांमध्ये रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील. अति विचार करू नये.
 • वृषभ:-जोडीदाराचे विचार जाणून घ्याल. उघडपणे बोलणे टाळाल. कमिशनमधून लाभ मिळेल. अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल. भागीदारीचे संबंध सुधारतील.
 • मिथुन:-फसवणुकीपासून सावध राहा. जामीन राहताना पूर्ण विचार करावा. नातेवाईकांच्या मदत मिळेल. चोरांपासून सावध राहावे. कामाचा आनंद मिळेल.
 • कर्क:-मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल. पोटाची तक्रार जाणवू शकते.
 • सिंह:-उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे मनापासून कराल. जोडीदाराशी विचारविनिमय कराल. क्षुल्लक कारणांवरून गैरसमज करून घेऊ नका. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.
 • कन्या:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचं हिशोब मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल. जवळचा प्रवास घडेल.
 • तूळ:-कौटुंबिक शांतता जपावी. आपले प्रभुत्व गाजवाल. आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामातून समाधान मिळवाल.
 • वृश्चिक:-तुमची उत्तम छाप पडेल. गप्पा गोष्टींची मैफल जमवाल. मित्रा मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. व्यसनांपासून दूर राहावे.
 • धनू:-आततायीपणा करू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. अनाठायी खर्च करू नये. मानसिक चंचलता जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
 • मकर:-आपल्या इच्छेला अधिक महत्व द्यावे. धार्मिक यात्रेसाठी नाव नोंदवाल. सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. अपवादाकडे दुर्लक्ष करा.
 • कुंभ:-चौकसपणे विचार कराल. मित्रांशी वादावादी संभवते. कामे चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे महत्व समजून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल.
 • मीन:-कामाचा व्याप लक्षात घ्यावा. गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल. लबाड लोकांपासून दूर राहावे. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment