![]() |
श्रीरामाला त्रास होईल: शिवसेना |
महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नुकताच सहकुटुंब अयोध्या दौरा केला आणि श्रीरामाचं दर्शन घेतलं. त्यांच्या या अयोध्यावारीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. तसंच, आमची छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील, असा टोला त्यांनी शिवसेनेला हाणला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून (Saamana Editorial) आज जोरदार उत्तर देण्यात आलंय. पाटील यांनी चांदमियांची उपमा देण्यात आली असून त्यांनी छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.
राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत, असं सुनावतानाच, 'तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल,' असा खोचक सल्ला शिवसेनेनं राज्यातील विरोधकांना दिला आहे.
द्धव ठाकरे यांच्या अयोध्या यात्रेमुळं महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावले आहेत. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर फालतू टीका-टिपणी सुरू केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत.
राज्यात फडणवीसांचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले, दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसे ढोंग राज्यातील भाजपवाले करीत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे, सगळ्यांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म असतो. त्या राजधर्माचे पालन श्रीरामाने केले. तोच राजधर्म महाराष्ट्रात चालवला जात आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment