शिवसैनिक अयोध्येस रवाना

 शिवसैनिक अयोध्येस रवाना

अयोध्या दौऱ्याकरीता मुंबई आणि उपनगरांतील शिवसैनिकांसाठी १८ डब्यांची विशेष रेल्वे आयआरसीटीसीच्या माध्यमातून आरक्षित केली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या आणि परतीचा प्रवास यासाठी हे आरक्षण आहे. ही विशेष रेल्वे गुरुवारी दुपारी १.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणार होती. मात्र ती नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे विलंबाने रवाना झाली. आज, संध्याकाळपर्यंत ही गाडी अयोध्येत पोहचेल. शनिवारी रात्री ११.३० वाजता या रेल्वेचा परतीचा प्रवास सुरू होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या, शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी गुरुवारी विशेष रेल्वेने शिवसैनिक अयोध्येस रवाना झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले आहे.

शिवसेनेचे काही पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदार विमान आणि पर्यायी साधनांनी अयोध्येत आज दाखल होणार आहेत. नोव्हेंबर २०१८मध्ये ठाकरे यांनी पहिल्यांदा अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी मुंबई आणि नाशिक येथून शिवसैनिकांनी दोन विशेष रेल्वे आरक्षित केल्या होत्या.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment