![]() |
शिवसेना आतून-बाहेरून तशीच आहे.. |
'महाराष्ट्रातील सरकार कोणाच्याही पाठिंब्याने चालत असले तरी उद्धव ठाकरे व शिवसेना आतून-बाहेरून जशी होती तशीच आहे. विचार आणि भूमिकेत कोणतेही बदल झाले नाहीत. प्रभू श्रीराम किंवा हिंदुत्व ही काही एकाच पक्षाची जहागिरी नाही,' अशा शब्दांत दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून विरोधकांना सुनावण्यात आलं आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महविकास आघाडी सरकारला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जात आहे. तिथं ते श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या शिवसेनेनं हिंदुत्व सोडण्याचा आरोप विरोधक विशेषत: भाजप करत आहे. त्यास उत्तर म्हणून शिवसेनेनं हा दौरा आयोजित केल्याचं बोललं जातं. त्याच पार्श्वभूमीवर 'सामना'त अग्रलेख लिहिण्यात आला असून त्यातून भाजपला टोले लगावण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा कोणत्याही मतलबाशिवाय आहे. महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या अशा भिन्न विचारधारेचे लोक एकत्र आले व त्यांनी सरकार स्थापन केले. हे सरकार देशाच्या घटनेनुसारच चालले आहे. अशा सरकारचे नेतृत्व ठाकरे करीत असल्यामुळे ते आता अयोध्येस कसे जाणार? श्रीरामाचे दर्शन कसे घेणार? असे पाणचट प्रश्न राज्यातील विरोधकांनी विचारले. आता उद्धव ठाकरे हे अयोध्येस पोहोचत आहेत. त्यामुळे विरोधकांची साफ पंचाईत झाली.
0 comments:
Post a Comment
Please add comment