शेअर बाजारात जोरदार उसळी

शेअर बाजारात जोरदार उसळी 

गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीने मुंबई शेअर बाजाराने सकाळची सुरुवात जोरदार उसळी घेऊन केली. सेन्सेक्स ५२३ अंकांनी वधारला. तर निफ्टी १६७ अंकांची वाढला. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदार सुखावले. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी वधारला असून तो ७२.४७ वर आहे.

आशियातील शेअर बाजारांमध्ये आज सकारात्मक लाट आली आहे.जपान आणि ऑस्ट्रेलियातील शेअर निर्देशांक वधारले आहेत. मंगळवारी खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाली. करोना व्हायरसने जागतिक अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान पाहता युरोपातील मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. त्याशिवाय फेडरल रिझर्व्ह, रिझर्व्ह बँक या बँकाही आगामी पतधोरणात व्याजदर कपात करतील किंवा आर्थिक मदतीसाठी उपायोजना करतील, अशी शक्यता अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये तेजीची लाट आहे. सोमवारी अमेरिकेचा डाऊ निर्देशांक ५ टक्क्यांनी वधारला होता. नॅसडॅक ४. ४९ टक्क्यांनी वाढला. मागील १० वर्षातील निर्देशांकाची एका दिवसातील मोठी झेप ठरली. आज सर्वच क्षेत्रात खरेदी सुरु आहे.

सोमवारी सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान 'सेन्सेक्स'ने ३९,०८३.१७ची उच्चांकी आणि ३७,७८५.९९च्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. त्याचवेळी 'निफ्टी'ने ११,४३३.०० अंकांची उच्चतम आणि ११,०३६.२५ अंकांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. 'मुंबई शेअर बाजारा'त (बीएसई) ९ कंपन्यांचे समभाग वरच्या पातळीवर आणि २१ कंपन्यांचे समभआग खालच्या पातळीवर बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) १५ कंपन्यांचे समभाग वधारले आणि ३५ कंपन्यांचे समभाग घसरले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment