corona house :देशात एकाच दिवशी आढळले १३० नवीन रुग्ण |
रविवारी २९ मार्च रोजी देशात एकाच दिवशी १३० नवीन रुग्ण आढळलीय. त्यामुळे चिंतेत भर पडलीय. रविवारी आढळलेल्या १३० रुग्णांपैंकी तब्बल २३ जण राजधानी दिल्लीत आढळले. तर महाराष्ट्रात रविवारी एकाच दिवशी दोन जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले.भारतात 'कोविड १९' पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत रविवारी एकाच दिवशी लक्षणीय वाढ दिसून आलीय. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १००० चा आकडा ओलांडलाय.
उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीत एकाच दिवशी करोनाबाधित रुग्णांची दोन अंकी संख्या गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्याच्या अधिकाऱ्यांनीही यावर चिंता व्यक्त केलीय.
राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवशी १०० हून अधिक रुग्ण सापडण्याची ही तिसरी वेळ आहे. करोना व्हायरस देशात तेजीनं फैलावत चालला असल्याचं हे लक्षण आहे. सोमवारी सकाळपर्यंत देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ११२२ वर पोहचलीय. यातील ३० जणांचा मृत्यू करोनामुळे झालाय.
corona house
0 comments:
Post a Comment
Please add comment