
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन, वित्त विभाग आणि गृह विभागाच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण ८०६ जागा भरण्यासाठी लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ३ मे २०२० रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदांच्या ६७ जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदांच्या ८९ जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदांच्या ६५० जागा
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदांच्या ६७ जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदांच्या ८९ जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदांच्या ६५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा किंवा बसलेला असावा.
वयोमर्यादा – अमागास उमेदवाराचे वय पोलीस उपनिरीक्षक पदांकरिता किमान १९ वर्ष ते कमाल ३१ वर्ष दरम्यान असावे तर अनाथ प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३४ वर्ष तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय ३६ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पदांकरिता ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवाराचे वय कमाल वय ४३ वर्ष आणि दिव्यांग उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि ते पोलीस उपनिरीक्षक पदांकरिता अपात्र असतील)
शारीरिक पात्रता – पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी पुरुष उमेदवाराची उंची कमीत-कमी १६५ सेंमी, छाती न फुगविता ७९ सेंमी (फुगविण्याची क्षमता किमान ५ सेंमी आवश्यक आहे) आणि महिला उमेदवाराची उंची कमीत-कमी १५७ सेंमी असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment