![]() |
'तो' पुन्हा योतो आहे! राज्यामधे मुसळधार पावसाची शक्यता |
अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात झपाट्यानं बदल होताना पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आल्या आहे. उत्तर भारतील अनेक भागांमध्ये मागील 24 तास पावसाच्या सरी आहेत. मात्र हा पाऊस आता मुंबई, रायगड आणि पालघरकडे सरकला आहे. येत्या 24 तासात हवामानात बदल होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा घसरला होता. त्यानंतर 15 फेब्रुवारीनंतर हवामानात सातत्यानं बदल होत होता. कधी थंडी तर कधी उष्णता त्यामुळे नागरिकही हैराण झाले होते. महिन्याच्या शेवटीही हवामानाची स्थिती विचित्र निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्रात थंड, कोकणात उन्हाळा, तर विदर्भ-मराठवाडय़ात पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाडय़ातील काही गावांमध्ये गारपीटीसह पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक बागायतदारांचं नुकसानही झालं होतं. वातावरणातील अस्थिरतेचा परिणाम पिकांवर होत आहे.
दोन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होत असल्याचं जाणवत आहे. दुपारी उकाडा तर रात्री थंडी असं काहीसं वातावरण झालं आहे. मुंबईसह 3 जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment