![]() |
पुण्यात कोरोनोचे ५ संशयित.... |
पुणे: 'करोना'च्या पाच संशयित रुग्णांना बुधवारी नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये दोन जण इटलीतून, तर तीन जण दक्षिण कोरियातून भारतात आले आहेत.
या प्रवाशांना अचानक कफ, थंडी, ताप, घसा खवखवणे आणि डोकेदुखीची लक्षणे जाणवू लागल्याने, त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या लाळेचे नमुने 'एनआयव्ही'कडे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी विलगीकरण कक्षात ठेवलेल्या चार संशयित रुग्णांची चाचणी 'निगेटिव्ह' आली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment