![]() |
करोना Live: केरळमध्ये ३ वर्षीय मुलीला करोनाची लागण |
देशात करोना विषाणूचे संक्रमण वाढतच चालले आहे. या विषाणूच्या संक्रमणामुळे इटलीत आतापर्यंत ३६६ आणि अमेरिकेत २१ लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, कोविड-१९ शी संबंधित घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला बांगलादेश दौरा रद्द केला आहे. तर, केरळमध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकलीला करोनाची लागण झाली आहे.
करोनाने जगभरात आतापर्यंत एकूण ३८०० जणांचे बळी घेतले आहेत. भारतात एकूण ३९ जणांना करोनाची लागण झाली आहे.
केरळच्या पठ्ठनमतिठ्ठा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने सर्व शैक्षणिक संस्थांना ३ दिवसांची सुट्टी केली जाहीर. मात्र इयत्ता १०वीची परीक्षा नियोजित वेळेत होणार. या जिल्ह्यात एकूण ५ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट. सर्व पीडितांना स्वतंत्र वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत इटलीहून ७ मार्चला कोच्ची येथे पोहोचली होती. विमानतळावर स्क्रीनिंगनंतर तिला रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मुलीच्या आई-वडिलांना रुग्णालयाच्या स्वतंत्र वॉर्डात ठेवण्यात आले आहे- डॉ. एन. के. कुट्टप्पन, एर्नाकुलम जिल्हा चिकित्सा अधिकारी.
करोनाग्रस्त मुलीला एर्नाकुलम कॉलेजच्या स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
या बरोबरच केरळमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ९ वर पोहोचली आहे.
करोनाची लागण झालेल्या या मुलीचे कुटुंब नुकतेच इटलीहून परतले आहे. कुटुंबातील सर्वच ५ जणांना करोनाची लागण झाली आहे.
केरळमधील एका तीन वर्षीय मुलीला करोना विषाणूची लागण
0 comments:
Post a Comment
Please add comment