रेल्वे मंत्रालयावर चौफेर टीका

View image on Twitter
रेल्वे मंत्रालयावर चौफेर टीका

'रेल्वेमंत्री म्हणजे 'प्रचारमंत्री''

महिलांना रेल्वे स्थानकांवर हमाली करावी लागणे ही शरमेची गोष्ट असून रेल्वेतर ही गोष्ट म्हणजे मोठी कामगिरी असल्याचे सांगत अशा गोष्टीचा गौरव करत आहे, अशी प्रतिक्रिया ग्राहक कल्याण संघाने व्यक्त केली आहे. संघाने रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचा उल्लेख प्रचारमंत्री असा केला आहे. समानत आणि सशक्तीकरणाच्या नावाखाली काहीही?, असा सवालही संघाने व्यक्त केला आहे.

देशातील विविध रेल्वे स्थानकांवर हमाली करणाऱ्या महिलांचा गौरव करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटवर चौफेर टीका होऊ लागली आहे. भारतीय रेल्वेसाठी हमालीचे काम करणाऱ्या महिलांनी आम्ही कुणाही पेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे, असे ट्विट रेल्वेने केले आहे. मात्र, रेल्वेने महिलांप्रती दाखवलेला हा दृष्टीकोन अनेकांना आवडला नसून त्यांनी रेल्वेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. महिलांना अशा प्रकारची कामे करावी लागणे ही शरमेची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात प्रगती केली असून हमालीच्या क्षेत्रातही महिला मागे नाहीत अशा अर्थाचे ट्विट रेल्वे मंत्रालयाने केले आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment