![]() |
IndiaLockdown | पुढील २१ दिवस अख्खा देश लोकडोउन - पंतप्रधान नरेंद्र मोदी |
महामारीने सर्वांना हतबल केले आहे. जगभरात प्रयत्न केले जात आहेत असे नाहीय, किंवा त्यांच्याकडे यंत्रणा नाहीय असे नाहीय. परंतू कोरोनाचा वेग एवढा आहे की, ते ही काही करू शकत नाहीत. यामुळे आज रात्रीपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, एकमेव उपाय त्यावर प्रभावी आहे. एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची सायकल तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका. आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. बेजबाबदारपणा असाच राहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मोदी यांनी दिला आहे.
जर आपण २१ दिवस काळजी घेतली नाही तर आपण २१ वर्षे मागे जाऊ. कोरोना इन्फेक्टेड झालेल्या रुग्णाला सुरुवातीचे काही दिवस कोणतीय लक्षणे दिसत नाहीत. यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची शक्यता आहे, असेही मोदी म्हणाले.
0 comments:
Post a Comment
Please add comment