![]() |
हार्दिक पांड्याची शतकी खेळी केली |
मुंबईत सुरू असलेल्या डीवाय पाटील टी-२० कप स्पर्धेत हार्दिकने शतकी खेळी केली. त्याने ३९ चेंडूत १०५ धावा केल्या. इतक नव्हे तर फलंदाजीनंतर गोलंदाजीत कमाल करत ५ विकेट देखील घेतल्या.
दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुनरागमानासाठी सज्ज झाला आहे. १२ मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याआधी हार्दिकने एक धमाकेदार खेळी केली आहे.
अष्ठपैलू हार्दिकने रिलायन्स वन संघाकडून खेळताना ८ चौकार आणि १० षटकार मारत ३७ चेंडूत १०० धावा केल्या. हार्दिकच्या या खेळीमुळे रिलायन्सने सीएजी विरुद्ध २० षटकात ५ बाद २२५ धावा केल्या. त्यानंतर रिलायन्सने सीएजीचा १५१ धावांवर ऑल आउट करत १०१ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद देखील उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment