GST विभागाची कारवाई; बनावट रॅकेट उद्ध्वस्त

Image result for gst
GST विभागाची कारवाई; बनावट रॅकेट उद्ध्वस्त


वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अधिकाऱ्यांनी बनावट देयकांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश मिळवले आहे. अशी सुमारे ७,८९६ कोटी रुपयांची बनावट देयके तयार करून सरकारला फसवण्यात आले आहे. यात २३ कंपन्या सहभागी असून त्या सर्व शेल कंपन्या आहेत.

केंद्रीय कर आयुक्तालयाच्या दिल्ली पश्चिम कार्यालयातील करचुकवेगिरी प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरील कारवाई केली. यामध्ये ७,८९६ कोटी रुपयांची बनावट देयके तयार करून ती जीएसटीअंतर्गत सादर करून त्याद्वारे १,७०९ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यात आल्याचेही या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यासाठी २३ शेल (बनावट) कंपन्यांचे नेटवर्क वापरले गेल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे.

या सर्व कंपन्यांनी वस्तूंची मागणी नोंदवून त्या खरेदी केल्याचे दाखवले आणि त्या व्यवहारासाठी बनावट देयके तयार केली. मात्र या वस्तू अस्तित्वात नसल्यामुळे त्यांचा पुरवठा प्रत्यक्षात झालाच नाही. परंतु पुरवठा झाल्याचे दाखवून त्याचे इनपुट टॅक्स क्रेडिटही घेण्यात आले.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment