सरकारची सार्वभौम सुवर्ण रोख्यांची योजना बाजारात आली

सरकारची सार्वभौम सुवर्ण रोख्यांची योजना बाजारात आली 

आर्थिक वर्ष २०१९-२० मधील सार्वभौम सुवर्ण रोख्यांची 'सीरिज-एक्स' सरकारने बाजारात आणली आहे. याअंतर्गत सुवर्णरोखे विक्री सोमवारपासून सरकारने सुरू केली. ही विक्री शुक्रवार, ६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ४,२६० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.
सुवर्णरोखे खरेदी करताना त्यासाठी एक ग्रॅम सोन्याची किमान खरेदी करण्याचे बंधन आहे. या रोख्यांसाठी सोन्याचा प्रति ग्रॅम ४,२६० रुपये हा भाव ९९९ शुद्धता असलेल्या सोन्याचा असून तो इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या गेल्या तीन दिवसांतील भावाची सरासरी आहे. सुवर्णरोखे खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या ग्राहकाने त्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास या मागणीसाठी ग्राहकाला द्याव्या लागणाऱ्या किंमतीवर सरकार ५० रुपये सवलत देत आहे. म्हणजे ऑनलाइल मागणी नोंदवणाऱ्या ग्राहकाला एक ग्रॅम सोने ४,२१० रुपयांना मिळणार आहे.
सुवर्णरोख्यांविषयी -
- रोख्यांची खरेदी करताना किमान एक ग्रॅम सोने रोखे स्वरूपात खरेदी करणे आवश्यक आहे.
- त्यामुळे अर्थातच किमान गुंतवणूक एक ग्रॅम सोन्याच्या रोख्यांसाठी निश्चित केलेल्या भावाइतकी करावी लागेल.
- एक ग्रॅम सोन्यासाठी सुवर्णरोखा खरेदी केल्यास तो ९९९ शुद्धतेच्या एक ग्रॅम सोन्याचे प्रतिनिधीत्व करतो.
- गुंतवणूकदारांना सुवर्णरोख्यांतील गुंतवणुकीवर दरसाल २.५ टक्के व्याज दिले जाईल.
- या रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजावर उगमकर (टीडीएस) कापला जाणार नाही.
- या रोख्यांची मुदतपूर्ती झाल्यावर मिळणाऱ्या रकमेवर भांडवली लाभ होत असेल तर त्यावर कर लागू होणार नाही.
- सुवर्णरोख्यांचा मुदतपूर्ती कालावधी आठ वर्षांचा असतो.
- कालावधी पूर्ण होण्याआधी रोखे बाजारात विकल्यास त्यावर मिळणारा भांडवली लाभ करपात्र असतो.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment