येस बँकेचे ग्राहक असाल तर 'या' गोष्टी जाणून घ्याच!

येस बँकेचे ग्राहक असाल तर 'या' गोष्टी जाणून घ्याच!

आपल्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत प्रमुख खासगी बँकांच्या पंगतीत जाऊन बसलेली येस बँक आर्थिक गर्तेत गेली आणि तिच्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली. खातेदार, ठेवीदार, कर्जदार (ऋणको), गुंतवणूकदार अशा विविध स्वरूपात हे ग्राहक आहेत. या ग्राहकांना ३ एप्रिलपर्यंत ५० हजार रुपये रक्कमच येस बँकेच्या खात्यातून काढता येईल. मात्र सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही सरकार व रिझर्व्ह बँक (आरबीआय) सातत्याने देत आहे.

५० हजारांची मर्यादा काय सांगते?

- बँकेवर ३० दिवसांसाठी, म्हणजे ३ एप्रिलपर्यंत आरबीआयने आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीपर्यंत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम खातेदारांना काढता येणार नाही.

- बचत खाते, मुदतठेव, कर्जाच्या हप्त्यासाठी ईसीएस पर्यायांतर्गत भरले जाणारे पैसे तसेच म्युच्युअल फंडाची एसआयपी असे सर्व मिळून हे ५० हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. तुम्ही दरमहिना एसआयपीचे २० हजार रुपये येस बँकेच्या खात्यातून भरत असाल तर आता ही रक्कम धरून तुम्हाला ३० हजार रुपयेच ३ एप्रिलपर्यंत काढता येईल.

या सेवांना बसणार फटका

- म्युच्युअल फंडांचे एसआयपी

- विविध बिले ः पाणीपट्टी, टेलिफोन, वीज, क्रेडिट कार्ड

- विम्याचे हप्ते, कर्जाचे हप्ते इत्यादी.

कर्जाचे हप्ते कसे भराल?

- तुम्ही कर्ज घेतले असेल आणि त्याच्या परतफेडीसाठी दरमहा हप्ता तुमच्या येस बँकेच्या खात्यातून जात असेल, तर यापुढे ते शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या धनकोशी त्वरित संपर्क साधावा.

- बँकेवर लागू करण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांचा कालावधी वाढू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हप्ते भरण्यासाठी अन्य व्यवस्था तातडीने करावी. एखादा हप्ता भरणे चुकल्यास तुमचा सिबिल स्कोअर बिघडू शकतो.

विमा हप्ते आणि एसआयपी

- येस बँकेचे खातेदार असलेल्या ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या म्युच्युअल फंड किंवा अन्य गुंतवणुकांतून काही परतावा मिळणार असेल, त्यांना ते पैसे त्यांच्या येस बँकेच्या खात्यात जमा केले जाणार नाहीत, असे कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनी व एडलविस म्युच्युअल फंड यांनी शुक्रवारी जाहीर केले.

- म्युच्युअल फंडांची एसआयपी दरमहा तुमच्या येस बँकेच्या खात्यातून जात असेल तर तातडीने ही एसआयपी दुसऱ्या बँकेतील खात्याकडे वळवा. म्युच्युअल फंडांसाठी अशा पद्धतीने बँक खाते तुम्ही केव्हाही बदलू शकता.

- विम्याचे हप्तेही येस बँकेतून जात असतील तर संबंधित विमा कंपनीला कळवून ते थांबवा व दुसऱ्या बँकेतील खात्यातून सुरू करा.

काय धडा घ्याल?

सीए संजीव गोखले यांच्या मते, प्रत्येकाने एकाच बँक खात्यावर विसंबून राहू नये. किमान दोन तरी बँक खाती असावीत. ही खाती उघडताना बँकांचे विविध प्रकार हाताळावेत. म्हणजे एक खाते सरकारी बँकेत उघडल्यास दुसरे खासगी किंवा सहकारी बँकेत उघडावे. त्याचबरोबर तुमची मिळकत विभागून ठेवावी. एकाच बँकेत मोठी रक्कम शक्यतो ठेवू नये. तशी रक्कम जमा होत असल्यास त्याच्या मुदतठेवी कराव्यात किंवा ती अन्यत्र गुंतवावी.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment