![]() |
माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे :देवेंद्र फडणवीस |
सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावा यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. राज्याचा बजेट आणि आपल्या घरच्या बजेटमध्ये फारसा फरक नसतो. राज्याचा बजेट व्यापक असतो एवढंच. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. घरातील बायकोचा पगार आणि आपला पगार, याच्यावर घरचं बजेट तयार करतो, असं सांगतानाच माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी त्यांना दिलखुलास दाद दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प: सोप्या भाषेत' या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. २००५मध्ये 'अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय?' हे पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर बरेच बदल झाले. अर्थसंकल्पाशी निगडीत कायदेही बदलले. त्यामुळे नव्या संकल्पनांसहीत हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक पीएचडी करणाऱ्यांसाठी नसून सर्वसामान्य लोकांनाही अर्थसंकल्प कळावा या हेतूने लिहिलं आहे. पुस्तक लिहितानाच ते ४० मिनिटांत वाचून होईल, ४५ मिनिटं लागताच कामा नये, हा हेतू ठेवूनच लिहिलं, असं फडणवीस म्हणाले.
0 comments:
Post a Comment
Please add comment