![]() |
दिल्लीपर्यंत पोहोचला करोना; आढळला पहिला पॉझिटीव्ह, देशभरात दोन रुग्ण |
जगभरात दहशत पसरवणारा नरसंहारक करोना व्हायरस (COVID-19) आता देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. दिल्लीबरोबरच तेलंगणमध्ये देखील एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत ज्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, ती व्यक्ती इटलीहून आल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरी व्यक्ती ही दुबईहून आली आहे. या पूर्वी केरळमध्ये करोना व्हायरसचे तीन पीडित आढळल्याचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment