भारतातही करोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ वर

भारतातही करोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ वर
भारतात करोना व्हायरस हात-पाय पसरताना दिसत आहे. राजधानी दिल्लीनंतर आर्थिक राजधानी मुंबईतही करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा जीवघेणा व्हायरस नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये, यासाठी भारत सरकार योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तरीदेखील आत्तापर्यंत भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं एक 'ट्रॅव्हल ऍडव्हायजरी' जारी केलीय. यानुसार, भारताकडून फ्रान्सजर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांचा व्हिजा काही काळासाठी रद्द करण्यात आलाय.

११ मार्च किंवा त्यापूर्वी फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनहून भारतात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नियमित आणि ई-व्हिजावर भारतानं बंदी घातलीय. या परदेशी नागरिकांनी अद्याप भारतात प्रवेश केलेला नाही.

यापूर्वीही भारतानं ऍडव्हायजरी जारी करत अनेक देशांच्या व्हिजावर बंदी घातली होती. भारताकडून चीन, साऊथ कोरिया, जपान, इटली यांसहीत काही देशांच्या व्हिजा आणि व्हिजा ऑन अरायव्हलवर बंदी घालण्यात आलीय. करोना व्हायरससंबंधी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय चाचणी सुरू आहे. भारतात आत्तापर्यंत ७ लाखांहून अधिक प्रवाशांची चाचणी करण्यात आलीय.

दरम्यान, एका ट्रॅव्हल एजन्सीसोबत दुबईला फिरण्यासाठी गेलेल्या पुण्यातील करोनाबाधित कुटुंबावर उपचार सुरु आहेत. तसेच या कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचा शोध मंगळवारी मुंबई महापालिकेने घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

उल्लेखनीय म्हणजे, जगभरात आत्तापर्यंत ४००० मृत्यू करोनामुळे झालेत. चीनच्या वुहानमधून पसरलेला करोना व्हायरस जगभर पसरतोय. अंटार्टिक सोडून पृथ्वीवरील सर्व द्वीप करोना व्हायरसच्या विळख्यात आहेत.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

1 comments:

  1. Why Indian government always took decision delayed 😠

    ReplyDelete

Please add comment