![]() |
करोना: भारतात २९ जण करोनाग्रस्त |
संपूर्ण जगात करोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. भारतातही आत्तापर्यंत या व्हायरसचा संसर्ग झालेले २९ जण सापडले आहे. त्यामुळे भारतातही करोना व्हायरसचा धोका वाढल्याचं दिसतंय.
LIVE अपडेट :
नवी दिल्ली : मंगळवारी इटलीहून भारतात दाखल झालेल्या १४ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता या रुग्णांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं. काल त्यांच्यावर आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये उपचार सुरू होते.
नोएडा : ग्रेटर नोएडाच्या बीटा २ मध्ये एका चीन नागरिकानं करोना व्हायरसच्या संशयानं स्वत:लाच घरात कोंडून घेतलंय. सीएमओ भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीचा रिपोर्ट करोना निगेटिव्ह आलाय.
'इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी' अर्थात इरडानं विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या नवीन पॉलिसीमध्ये करोना व्हायरसच्या उपचाराचा खर्चाचादेखील समावेश असेल.
अमेरिका : सॅन फ्रान्सिस्कोहून हवाईला जाणाऱ्या क्रुज शिप 'ग्रॅन्ड प्रिन्सेस'मधून प्रवास करणाऱ्या २१ जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळली आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये करोना व्हायरसनं झालेल्या एका मृत्यूनंतर स्थानिक गव्हर्नर न्यूसम यांनी आपत्कालीन परिस्थिती घोषित केलीय.
हरियाणा : हरियाणाहून सॅम्पल टेस्टसाठी धाडण्यात आलेले तीन सॅम्पल करोना निगेटिव्ह आढळले आहेत. सिरसाचे डेप्युटी सिव्हिल सर्जन डॉ. वीरेश भूषण यांनी ही माहिती दिलीय.
0 comments:
Post a Comment
Please add comment