![]() |
CoronavirusUpdates | भारतात कोरोना बाधितांचा आकडा वाढला; देशभरात 396 कोरोनाग्रस्त |
कोरोना व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 396 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील सुरत येथे एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याआधी बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे देशात सात जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. परंतु, एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पटनामधील एम्स रूग्णालयात एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती मुंगेर येथील मुळ निवासी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कतार येथून बिहारला आला होता.महाराष्ट्रात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशातच भारतात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 315 होता. यामध्ये वाढ होऊन सध्या कोरोना बाधितांचा आकडा 396 वर पोहोचला आहे. देशामध्ये सर्वाधित कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. येथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 63 आहे. तसेच केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 52 आहे. याआधीही महाराष्ट्रात एका व्यक्तीचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या पाहा
0 comments:
Post a Comment
Please add comment