CoronavirusOutbreakUpdates | जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाख, 11385 मृत्यू

CoronavirusOutbreakUpdates
CoronavirusOutbreakUpdates | जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाख, 11385 मृत्यू 
कोरोना व्हायरसने जगभरातील 177 देशांमध्ये थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजारावर नवे रुग्ण आढळले असून 1354 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायतक बाब म्हणजे एकट्या इटलीत गेल्या 24 तासात तब्बल 627 जणांचा बळी गेला आहे. इटलीत 2 मार्चला 52 मृत होते, गेल्या 19 दिवसात इटलीमध्ये 3950 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृत्यांचा आकडा एक हजारहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात स्पेनमध्ये 262 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 13 दिवसात 1063 जणांचा मृत्यू झाला आहे.


जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर गेला आहे. तर 11 हजार 385 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन 92 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. तर सात हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती अद्याप गंभीर आहे.


कोरोनामुळे विविध देशांमधील मृतांचा आकडा
देशमृत्यूएकूण रुग्ण
चीन3,25581,000
इटली4032 47,021
स्पेन 109321,510
इराण143319,644
फ्रान्स 45012,612
अमेरिका25819,640
इंग्लंड1773,983
दक्षिण कोरिया1028,799


आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रामध्ये या जीवघेण्या विषाणूचे सर्वाधिक 52 रूग्ण आहेत. यामध्ये तीन परदेशी लोकांचा समावेश आहे. यानंतर केरळमध्ये 28 संसर्गजन्य लोक असून दोन विदेशी नागरिक आहेत. या दोन राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये 22, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, दिल्लीमध्ये 17, लदाखमध्ये 10, तेलंगणामध्ये 17, राजस्थानमध्ये 1, जम्मू काश्मिरमध्ये चार, तमिळनाडूमध्ये 3, ओडीशामध्ये 2, पंजाबमध्ये 2, उत्तराखंडमध्ये 3. आंध्रप्रदेशमध्ये 3, बंगालमध्ये 3, चंदिगढमध्ये एक, पद्दुचेरीमध्ये एक, गुजरातमध्ये 5 आणि छत्तीसगढमध्ये एक कोरोनाग्रस्त आहे.संबंधित बातम्या पाहा About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment