जगभरात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरसने भारतामध्ये शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारतात करोनाचे ६० रूग्ण आढळले आहेत. करोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुण्यातही करोनाचे पाच रूग्ण आढळले आहेत. पुण्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या पाच रूग्णांपैकी एका रूग्णाच्या घरावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या सोलापूरमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा’, असे म्हणत त्या व्यक्तीच्या घरावर गावकर्यांनी बहिष्कार टाकला आहे.
त्या वक्तीच्या घरच्यांना सतत गाव सोडून जाण्यासाठी तगादा लावला जात आहे. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा,’ असा मानसिक त्रास दिला जात असल्याचे करोना बाधित रुग्णाच्या भावाने सांगितले. लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी साधलेल्या संवादावेळी त्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली. या संपूर्ण प्रकरणाविरोधात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. रूग्णाच्या भावानी आपली व्यथा मांडली. तो म्हणाला की, ‘करोना व्हायरस या आजाराचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक माझा भाऊ आहे. माझ्या भावाला आजार झाल्याचे समजताच घरी जाऊन सर्वांना धीर दिला. काही क्षणांतच प्रसारमाध्यमांत माझ्या भावाच्या नावासह बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर काही तासांत गावाकरी आमच्या घरी आले, विचारपूस करू लागले. तर काहींनी तुम्ही गावामध्ये राहू नका, तुमच्यामुळे आम्हाला हा आजार होईल, असे सांगितले.’
0 comments:
Post a Comment
Please add comment