![]() |
Corona Outbreak : चीन पेक्षा इटलीत सर्वाधिक मृत्यू बघा रिपोर्ट |
इटलीमध्ये करोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. इटलीत जगात करोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी, इटलीमध्ये करोना विषाणूमुळे ४२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे इटलीत करोनामुळे एकूण ३४०५ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये करोनाच्या संसर्गामुळे ३२४५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इटलीमध्ये करोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी १२ मार्चपासून इटलीमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. आता या लॉकडाऊनचा अवधी अनिश्चितकाळासाठी वाढवण्यात आला आहे. इटलीमधील जवळपास सर्वच नागरिकांना त्यांच्या घरी रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इटलीमध्ये सरकारने अनेक प्रयत्न करूनही करोनाचा संसर्ग अधिकच फैलावत आहेत. इटलीत सध्या ४१ हजारहून अधिकजणांना करोनाचा संसर्गाची बाधा झाली आहे.
इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे इटलीतील संपूर्ण यंत्रणा उध्वस्त होण्यापासून बचावली आहे. मात्र, लॉकडाऊन हटवल्यानंतरही इटली पूर्वपदावर येण्यास बराच वेळ लागणार आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या तुलनेत जवळपास २० पट कमी असणाऱ्या इटलीत मृत्यूने थैमान घातले आहे. इटलीत अजूनही २४९८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment