![]() |
इराणमधल्या अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले |
मध्यरात्री इराणच्या तेहरानमधून 234 भारतीय एअर इंडियाच्या विमानानं भारतात परतले. त्यात महाराष्ट्रातील 58 भाविकही आहेत. मायदेशी परतताच या मराठी बांधवांनी सेल्फी व्हीडिओ पाठवत एबीपी माझाचे आभार मानलेत. शिवाय, शरद पवार आणि कुटुंबियांचे ऋणी असल्याचं म्हटलं आहे. मागील 23 दिवसांपासून हे महाराष्ट्रातील भाविक इराणमधील तेहरानमध्ये अडकले होते. 23 फेब्रुवारीला एबीपी माझानं पहिल्यांदा इराणमध्ये अडकलेल्या या भाविकांचं वृत्त दाखवलं आणि त्यानंतर शरद पवारांच्या आणि सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या मदतीनं ते मध्यरात्री भारतात सुखरुप परतले.
इराण आणि इराकमधील मुस्लिम धर्मस्थळांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील 44 भाविक 21 फेब्रुवारीला भारतातून तेहरानला पोहचले होते . मात्र याच काळात जगभर कोरोना व्हायरसची दहशत असल्याने सर्वच देशांनी आपल्या सीमा सील केल्या होत्या. त्यामुळे या भाविकांना तेहरान मधून बाहेर पडणे अशक्य होते. यानंतर लगेचच या भाविकांनी भारतात परत येण्याचे प्रयत्न सुरु केले. यानंतर त्यांच्या सुटकेसाठी अनेक राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. अखेर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि अखेर भारतीय वैद्यकीय पथकाने भाविकांची तेहराणामध्ये आरोग्य तपासणी केल्यावर त्यांच्या परतीचा मार्ग सुकर बनला.
या सर्व अडकलेल्या भाविकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment