भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण  ४४ जागासुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, सायकोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, टेक्निशियन, आणि पीर सपोर्टर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भंडारा स्टाफ नर्स पदाकरिता “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा येथे आणि इतर पदांकरिता ”
  • टेलिमेडिसिन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, भंडारा” येथे अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १३ मार्च 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment