डोळ्यांच्या काळ्या वर्तुळांवर गुणकारी बदामाचं तेल

Image result for काळ्या वर्तुळांवर
डोळ्यांच्या काळ्या वर्तुळांवर गुणकारी बदामाचं तेल

आपल्याला चेहऱ्याची, त्वचेची काळजी घेण्याचे खूप उपाय, फेसपॅक माहित असतात; पण जोपर्यंत आपण ते करून पाहात नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नसतो. हे उपाय करायला आपल्याकडे वेळ नसतो. म्हणूनच काही झटकन करण्याचे उपाय आपल्याला माहित हवेत. बदामाचं तेल हा त्वचेवर असाच एक झटपट उपाय आहे. बदामाच्या तेलाने त्वचेवर डाग राहात नाहीत आणि त्वचेचं केवळ बाहेरूनच नव्हे तर आतून पोषण होतं.बदामाचे गुण -

बदामाच्या तेलात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि खनिजं असतात. उदाहरणार्थ - व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एकतर आपण उन्हात घराबाहेर पडत नाही किंवा बहुतांश वेळेत ऑफिसमध्ये एसीत बसतो. त्यामुळे ड जीवनसत्वाची कमतरता भासते. परिणामी हाडे दुखतात.
बदामाच्या तेलाचे फायदे -

- बदामाचं तेल त्वचेवर लावल्यावर त्वचेच्या पेशींना संपूर्ण पोषण मिळतं. त्वचा सुंदर, निरोगी बनते. या तेलातील व्हिटॅमिन्स आणि खनिजे त्वचा शोषून घेते आणि स्नायू मजबूत होतात.

- बदामाच्या तेलातील डी जीवनसत्त्वामुळे त्वचेतील मृत पेशी जाऊन नव्या पेशी तयार होण्यास मदत होते. डोळ्यांच्या नाजूक त्वचेसाठी देखील बदाम तेल गुणकारी आहे.

- बदामाच्या तेलाने संपूर्ण शरीराला मालिश केल्यास आणि योग्य डाएट केल्यास ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. चेहऱ्यावर चमक येते.

काळ्या वर्तुळांसाठी

बदामाच्या तेलातील ई व्हिटॅमिन डोळ्यांच्या नाजुक त्वचेचं पोषण करतं. यामुळे डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने चेहऱ्यावर मसाज करावा.

अँटीएजिंग

बदाम एक अँटिएजिंग ऑइल प्रमाणे काम करतं. हे तेल चेहरा आणि मानेच्या त्वचेवर वाढत्या वयाचे परिणाम जाणवू देत नाही. म्हणूनच दररोज संपूर्ण चेहऱ्यावर किंवा शरीरावच बदामाच्या तेलाने मालिश करावं. यामुळे टॅनिंग, रॅशेस, ड्रायनेससारख्या समस्या दूर राहतात.
तेल कसं लावायचं?
चेहरा आणि मानेच्या मसाजसाठी काही थेंब पुरेसे असतात. एक चमचा तेलात तुम्ही संपूर्ण शरीराला मसाज करू शकता. अधिक तेल वापरल्यास त्वचा ते शोषून घेईल आणि त्वचेवर ऑइल दिसू लागेल.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment