आवी दे करोना बिरोना…; अमिताभ यांची काव्यात्मक फिरकी

चीनमधील वुहान या करोना विषाणूच्या केंद्रस्थान असेल्या शहरातून पसरलेल्या रोगामुळे जगभरामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या साडेचार हजारहून अधिक झाली आहे. चीनबरोबरच इतर ९० हून अधिक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे. या व्हायरसचा भारतातही शिरकाव झाला आहे. पुण्यात करोनाचे आठ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात आता एकूण १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडल्याचे समजते आहे. अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी करोनावर एक कविता केली आहे.
बिग बींनी नुकताच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी करोना व्हायरसवर मेसेज फॉर्वड करणाऱ्यांची काव्यात्मक फिरकी घेतली आहे. त्यांची ही कविता चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे.“बहुतेरे इलाज बतावें ,जन जनमानस सब ,

केकर सुनैं, केकर नाहीं, कौन बताए इ सब ;
केयु कहिस कलौंजी पीसौ, केयु आँवला रस
केयु कहस घर  म बैठो, हिलो न ठस से मस 
ईर कहेन औ बीर कहेन, की ऐसा कुछ भी Carona ,
बिन साबुन से हाथ धोई के ,केहू के भैया छुओ न ;
हम कहा चलो हमौ कर देत हैं , जैसन बोलैं सब 
आवय देयो , Carona-फिरोना , ठेंगुआ दिखाऊब तब !" ~ अब


सध्या संपूर्ण देशात करोनाची दहशत पाहायला मिळते. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. यामध्ये रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. तर परदेशात होणाऱ्या काही चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment