CoronavirusOutbreakUpdates | हॉलिवूडमधील या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण


 1. Actor Idris Elbala
  Actor Idris Elbala
  हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपटांमध्ये दिसून आलेला अभिनेता इदरीस इल्बाला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'कोरोनाची तपासणी केल्यावर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. तसेच काळजी करू नका माझ्या प्रकृतीबाबत मी सोशल मीडियावर माहिती देत राहिल असंही त्याने सांगितलं आहे.
 2. tom hanks and rita wilson
  tom hanks and rita wilson
  हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्याची पत्नी रीटा विल्सनलाही कोरोनाची बाधा झाली आहे. अभिनेता टॉम हँक्स आपल्या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ऑस्ट्रेलिया येथे गेले होते. जिथे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली. दरम्यान, टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. ते सोशल मीडियावरून नेहमी आपल्या प्रकृतीबाबत फॅन्सला माहिती देत आहेत.
 3. Actress Olga Kurelenko
  Actress Olga Kurelenko
  जेम्स बॉन्ड सीरिजमधील क्वांटम ऑफ सोलेसमध्ये दिसून आलेली युक्रेनी म्हणजेच, अभिनेत्री ओल्गा कुरलेंकोदेखील कोरोनाग्रस्त आहे. दरम्यान, ओल्गाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली आहे. तसेच तिने आपल्या चाहत्यांना कोरोनापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे.
 4. Actor Christopher Hivu
  Actor Christopher Hivu
  गेम ऑफ थ्रोन्स मधील अभिनेता ख्रिस्तोफर हिवु देखील कोरोना बाधित आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती दिली. त्याने सांगितलं की, त्याने स्वतःला आपल्या घरात आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. तसेच आपल्या प्रकृतीबाबत सांगताना त्याने सांगितले की, सध्या त्याला सर्दीचं लक्षण जाणवत आहे. तसेच त्यानेही आपल्या चाहत्यांवा कोरोनापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
 5. CEO Lucian Gringe
  CEO Lucian Gringe
  युनिवर्सल म्युझिक ग्रुपचे सीईओ लुसियन ग्रिंज यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ते रूग्णालयात असून त्यांनी 29 फेब्रुवारी रोजी आपला 60वा वाढदिवस साजरा केला होता.About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment