Coronavirus | पुण्यातील 41 वर्षांची महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

पुण्यातील  41 वर्षांची महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह 
परदेशात प्रवास न करूनही पुण्यातील एका महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सिंहगड रस्ता भागात राहणारी ही 41 वर्षांची महिला उपचारांसाठी कात्रज भागातील भारती हॉस्पिटलमध्ये 16 मार्च पासून भरती आहे . 
तिची तब्येत खराब झाल्याने डॉक्टरांनी तिचे स्वॅब टेस्टिंगसाठी एनआयव्हीकडे पाठवले असता ते पॉझिटीव्ह आले आहेत. या महिलेने ओला कारमधून प्रवास केला होता आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला ती वाशीमधे एका लग्नकार्यालयातही उपस्थित होती. ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती याची माहिती प्रशासनाकडून घेतली जातेय तर भारती हॉस्पिटल मध्येउपचार सुरू असताना तब्येत खालावल्याने या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
कोरोना संशयित रुग्णांना घरातच रहा असा सल्ला सरकार आणि प्रशासन करीत असताना देखील अनेक स्थानबद्ध करण्यात आलेले रुग्ण विभागात खुले आम फिरत आहेत. अशाचप्रकारे धारावीमध्ये दुबईवरून आलेल्या एका 43 वर्षीय अलगीकरण करण्यात आलेला रुग्ण ज्याच्या हातावर कोरंटाईनचा स्टँप मारण्यात आला होता. तो खुले आम फिरत होता. याची माहिती स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याला सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


संबंधित बातम्या पाहा  About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment