![]() |
बापरे ! मुंबई, पुणे, पिंपरीत आणखी तीन करोनाग्रस्त |
मुंबई, पुणे आणि पिंपरीत करोनाचे आणखी तीन रुग्ण आढळले असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५२वर पोहोचली आहे. तसेच करोनाच्या ५ संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोना रुग्णांची माहिती दिली. राज्यातील १०३५ रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ९७१ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मात्र, या पाचही जणांवर १४ दिवस लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, पुणे आणि पिंपरीत आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ५२वर पोहोचली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment