आजचे राशीभविष्यमेष : मानसिक प्रसन्नता देणारा दिवस. अनुकूल घटना घडतील. घरातील इतर सदस्य आपुलकीने वागतील.

वृषभ : संततीबरोबर धमाल कराल. मौल्यवान चीजवस्तू जपा. नोकरदारांसाठी नवीन योजना राबविल्या जातील.

मिथुन : प्रिय व्यक्तीचा अबोला सहन करावा लागेल. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्याल. महिलांनी अनावश्यक खरेदीचा मोह टाळावा.

कर्क : अतिचिंता केल्याने प्रकृती स्वास्थ्य बिघडेल. पत्नीबरोबर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कराल. फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहा.

सिंह : वायफळ बडबड करणे घातक ठरेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळेल. व्यवसायात प्रगतीचा आलेख उंचावेल.

कन्या : मानसिक ताण वाढेल. अवाजवी खर्चाला लगाम घाला. घरातील ज्येष्ठांशी आदराने बोला.

तुळ : वैवाहिक आयुष्यात अविस्मरणीय घटना घडेल. मौजमजा व करमणुकीचा दिवस. व्यक्तिमत्त्व बहरेल.

वृश्चिक : सांपत्तिक स्थिती उत्तम राहील. संततीच्या यशामुळे भारावून जाल. मनोवांच्छित पूर्ण होईल.

धनु : आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता. मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

मकर : तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसिक ताणातून मुक्त व्हाल. आशादायी दिवस.

कुंभ : वादविवादाच्या प्रसंगापासून दूर राहा. मित्रमंडळींसाठी आर्थिक उदारता नको. आर्थिक व्यवहारातील नियमांचे काटेकोरपणे पालन करा.

मीन : वैयक्तिक आयुष्यात अनुकूल घटना घडतील. आनंदाने बेहोष व्हाल. उत्साहाच्या भरात शब्द देऊ नका.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment