आजचे राशीभविष्य

 • मेष:-मानसिक व्यग्रता जाणवेल. ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका. काही वेळेस शांत राहणेच फायद्याचे ठरेल हे लक्षात ठेवा. आवडीचे पदार्थ चाखाल.
 • वृषभ:-घरगुती कामाचा व्याप वाढेल. व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्‍यांची गाठ पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. पत्नीची उत्तम साथ मिळेल.
 • मिथुन:-कामे मनाजोगी पार पडतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील. गोड बोलण्यातून कामे साधता येतील. अधिकारी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळेल. दिवस चांगल्या लोकांमधे घालवाल.
 • कर्क:-आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कामात चंचलता आड आणू नये. वरिष्ठांचा शब्द मानावा लागेल. मनातील अनामिक भीती बाजूला. आत्मविश्वास कमी पडू देवू नका.
 • सिंह:-सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.
 • कन्या:-भागिदारीतून चांगला लाभ होईल. काही नवीन गोष्टींचा अवलंब करावा. संपर्कातील लोकांकडून फायदा होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पारंपरिक कामात लक्ष घालावे.
 • तूळ:-प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने सोडवावे. वाहन विषयक कामे निघतील. आरोग्यात सुधारणा होईल.
 • वृश्चिक:-कामाचा विस्तार वाढवावा. जवळच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. दिवस खेळीमेळीत जाईल.
 • धनू:-प्रवासात सावध राहावे. नातेवाईकांचा विरोध होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळावा. गरज नसतांना पैसे खर्च करू नका. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत.
 • मकर:-पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. हातात नवीन अधिकार येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. उगाचच चिडचिड करू नये.
 • कुंभ:-जास्त खोलात जाऊन चौकशी कराल. आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे. काही गोष्टीत धूर्तपणे वागावे लागेल. योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा.
 • मीन:-चंचलतेवर मात करावी. मुलांचा हट्ट पुरवाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. थोडा त्रास झाला तरी कमाई वाढेल. भावनेला आवर घालावी लागेल.
               -ज्योतिषी विद्याधर करंदीकर
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment