आजचे राशीभविष्य

 • मेष:-दूरच्या प्रवासाचा योग येईल. जास्त धाडस करू नका. व्यावसायिक प्रगतीचे दर उघडेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. कामात चंचलता आड आणू नका.
 • वृषभ:-व्यावसायिक बदलाचे वारे मनात वाहू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. तब्बेतीच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.
 • मिथुन:-मनातील आकांक्षा विनासायास पूर्ण होतील. तरुण वर्गाने कसलीही घाई करू नये. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. जोडीदाराविषयी मतभेद संभवतात.
 • कर्क:-महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी. वरिष्ठांना नाराज करू नका. धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा. भावंडांची काळजी लागून राहील. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.
 • सिंह:-तुमचा मनमोकळा स्वभाव इतरांच्या नजरेत भरेल. वरिष्ठांच्या शाबासकीस पात्र व्हावे. प्रेमप्रकरणातील जवळीक त्रासदायक ठरू शकते. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. जवळचा प्रवास घडेल.
 • कन्या:-मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. कामात चिकाटी ठेवावी लागेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या कामातून लाभ संभवतो. अति अपेक्षा बाळगू नका.
 • तूळ:-हाती सोपवलेले काम वेळेत तडीस न्याल. कामात कसलीही घाई उपयोगाची नाही. डोके ठिकाणावर ठेवून वागावे. कौटुंबिक बाजू ध्यानात घेऊन वागावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
 • वृश्चिक:-जोडीदाराशी मतभेद टाळावेत. स्वकष्टाने आर्थिक बाजू सुधाराल. आपल्या वागण्याने कोणी दुखवणार नाही याची काळजी घ्यावी. सत्य-असत्याची खातरजमा करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.
 • धनू:-बाह्यरुपावर भुलू नका. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. नवीन आव्हानाला सामोरे जाल. तुमची काम करण्याची शक्ती वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल.
 • मकर:-सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. तुमच्या संभाषणाची उत्तम छाप पडेल. कामात अधिक उत्साह येईल. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.
 • कुंभ:-व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. काही गोष्टींचे धोरण ठरवावे लागेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. तुमची मानमान्यता वाढेल.
 • मीन:-नैराश्याला बळी पडू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मैत्रीचे नाते जपावे. जमिनीच्या कामास गतीमानता येईल. अति श्रमाचा थकवा जाणवेल.
         -ज्योतिषी विद्याधर करंदीकर
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment