शेअर मार्केटमध्ये जबरदस्त घसरण, सेन्सेक्स 1400 आणि निफ्टी 400 अंकानी पडला

शेअर मार्केटमध्ये जबरदस्त घसरण, सेन्सेक्स 1400 आणि निफ्टी 400 अंकानी पडला

शेअर बाजार (Share Market) आज मोठ्या घसरणीसह खुले झाले आहे आणि सुरुवातीच्या व्यापारातही प्रचंड घसरण दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange ) Sensory Index Sen-sex आज 626.42 अंकांवर पडला व 36,950.20 वर स्थिरावला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange) निर्देशांक निफ्टी सोमवारी  247.4 वर गडगडला. येस बँकेवरील (Yes Bank) संकट, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि कोरोना व्हायरस (Corona Virus) या संकटाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.
बीएसईचा (BSE) सेन्सेक्स सोमवारी पहाटे 9 वाजून 24 मिनिटांनी 3.01 टक्क्यांनी 1131.39 अंकावर गडगडला. तर निफ्टी (Nifty) 2.94 टक्क्यांनी 322.90 अंकांची घसरण झाली. यावेळी निफ्टी - 50 मधील फक्त 5 कंपन्यांचे समभाग ग्रीन मार्कवर (Green Mark) आणि 45 कंपन्यांचे शेअर रेड मार्कवर (Red Mark) व्यापार करताना दिसले. आता सौदी अरेबियाने तेल बाजारपेठेला मोठा धक्का दिल्याने रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध पुकारले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.
निफ्टीच्या 50 समभागांविषयी सांगायचे झाले तर सुरुवातीच्या व्यापारात सर्वात अधिक गती येस बँकेच्या शेअरमध्ये दिसून आली. येस बँकेचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात 16.41 टक्क्यांच्या वाढीसह 18.80 वर व्यापार करीत होते. यानंतर बीपीसीएल सर्वात वेगवान 3.76 टक्क्यांनी वाढत असून तो 418.25 वर ट्रेंड होताना दिसला. दुसरीकडे, निफ्टी - 50 मधील सर्वात मोठी घसरण ओएनजीसी या कंपनीत तब्बल 9.27 टक्के झाली आहे. तो  80.30 वर तो ट्रेंड होताना दिसला. निर्देशांकाच्या सततच्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे काही लाख कोटींचे नुकसान झाले आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment