![]() |
कोरोना; महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 122 वर |
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या आज दुपारपर्यंत 116 होती.
मात्र, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता.
त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. तर मुंबईतही आणखी चार जण कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं.
त्यानंतर आज संध्याकाळ मुंबईत आणखी 5 जणांना आणि ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
सांगलीतील कोरोना बाधितांवर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित कुटुंब हे इस्लामपूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे.
नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधितांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.
*कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
▪ मुंबई : 50
▪ पुणे : 19
▪ पिंपरी चिंचवड : 12
▪ सांगली : 9
▪ कल्याण : 5
▪ नवी मुंबई : 5
▪ नागपूर : 4
▪ यवतमाळ : 4
▪ अहमदनगर : 3
▪ ठाणे : 4
▪ सातारा : 2
▪ पनवेल : 1
▪ उल्हासनगर : 1
▪ वसई विरार : 1
▪ औरंगाबाद : 1
▪ रत्नागिरी : 1
एकूण = 116
0 comments:
Post a Comment
Please add comment