येत्या 12 तासांत हवामान मोठा बदल, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या 12 तासांत हवामान मोठा बदल, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसचं एक संकट आधीच असताना आता आणखी एक संकट येणार आहे. येत्या 24 तासांत देशातील अनेक भागांसह महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, ललितपूर, नागपूर, नांदेड, हिंगोली, नंदुरबार, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 12 तासांत या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

गुरुवारी कोकण किनापट्टीलगच्या काही भागांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. नाशिकमधील मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झालं. संचारबंदी असताना देखील ती मोडून सकाळ पासून बाहेर फिरणाऱ्यांना जोरदार पावसाने घरात बसण्यास पाडले भाग. बदलत्या हवामानामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याची चिंता आहेच. आधीच कोरोनामुळे व्यवसायात समस्या निर्माण झाल्या असताना आता अवकाळी पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजनानुसार महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये येत्या 12 तासांत मुसळधार पाऊस प़डणार आहे. बंगालकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानत वेगानं बदल होत आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक बदल होत आहेत. त्यामुळे येत्या काळातील वातावरणातील वेगानं बदल होतील अशी शक्यता हवामान विभागनं वर्तवली आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment